News 
    Young inspiration charitable society मार्फत घेतल्या गेलेल्या सातारा हिल सायक्लोथॉन मध्ये प्रकाश ओलेकर ने मारली बाजी ( Young Inspiration Charitable Society Satara )

    Posted On November 26,2018

      

    Young inspiration charitable society मार्फत झालेल्या द्वितीय सातारा हिल सायक्लोथॉन मध्ये प्रकाश ओलेकर याने 60 किमी च्या मुख्य स्पर्धेमध्ये 1.43.36  एवढे विक्रमी वेळ घेऊन प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर अनुक्रमे विजय  सपकाळ 1.44.44 द्वितीय तर निकेत पाटील याने 1.47.01 मध्ये तिसरा क्रमांक मिळवला.
    मुलींन मध्ये मनवी पाटील ही 2.25.06 वेळेवसह प्रथम, चैताली शिलदनकार 2.27.30 सह द्वितीय तर प्रांजली पाटोळे 2.39.29 सह तिसऱ्या क्रमका वार आली
    दरम्यान 60 किमी मुख्य स्पर्धा व 15 किमी फन राईड ची सुरवात तालीम संघ मैदान इथून माननीय खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ध्वज दाखवून सुरुवात झाली
    तालीम संघ , राजवाडा , समर्थ मंदिर , बोगदा, येवतेशवर मार्गे कास व परत तालीम संघ अश्या मार्गावर मुख 60 किमी स्पर्ध पार पडली या मध्ये स्त्री व पुरुष मिळून साधारण 210 स्पर्धकांचा सहभाग होता
    तसेच तालीम संघ मैदान, राजवाडा, समर्थ मंदिर, बोगदा , डबे वाडी मार्गे आंबवडे गाव फाटा व परत तालीम संघ मैदान या मार्गावरील 15 किमी फन राईड मध्ये 200 लोकांनी सहभाग घेऊन उत्साहात स्पर्धा पूर्ण केली.
    माननीय आमदार श्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी सातारा हिल सायक्लोथॉन चे  अध्यक्ष प्रफुल शाह, उप अध्यक्ष अलनकर जाधव, माजी अध्यक्ष मंगेश जाधव, सचिव adv सुनिल गंबरे, खजिनदार धनंजय खोले, प्रवीण भडगावे, सचिन देशमुख, शशिकांत पवार, संकेत परामने, चैतन्य गायकवाड, अजय भोसले, मंदार क्षीरसागर, विशाल जगदाळे, अक्षय जाधव व इतर सदस्य उपस्थित होते
    या स्पर्धेचे आयोजन कट्टा ग्रुप शाहूपुरी यांच्या वतीने करण्यात आले होते